Mon. Jan 24th, 2022

‘बिग बीं’च्या बंगल्याची भींत तोडण्यात मनपा अपयशी

बॉलिवूडमधील बिग बी म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगल्याचा भाग तोडण्यात महानगरपालिका अपयशी ठरली आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याची भिंत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडसर ठरत असल्यामुळे २०१७मध्ये मुंबई महानगर पालिकेकडून अमिताभ बच्चन यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या नोटीसला अमिताभ बच्चन यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचा भाग तोडण्यास महानगरपालिका अपयशी ठरल्यामुळे काँग्रेसकडून मनपाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. महानगरपालिकेने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्वेक्षण अधिकाऱ्यांना अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याचा पाडलेला भाग ओळखण्याचे निर्देश दिले होते.

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची भिंत रस्ते रुंदीकरणासाठी अडसर ठरत आहे. त्यामुळ रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रतिक्षा बंगल्याच्या भींतीचा भाग तोडणे गरजेचे असल्याचा अहवाल अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र मुंबई पालिकेने यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे काँग्रेसने लोकायुक्तांकडे तक्रार केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *