Fri. Jan 21st, 2022

महापालिकेने पुरबाधित भागातून उचलला साडेचार हजार टन कचरा

सांगली महापालिकेने पुरबाधित भागातून आतापर्यंत साडेचार हजार टन कचरा उचलला आहे. यासाठी दररोज साडेपाचशे कर्मचारी आणि ५८ वाहने कार्यरत होती. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या योग्य नियोजनामुळे पूर पट्टा कचरामुक्त होत आहे.यासाठी अन्य महापालिकांच्या १०५ कर्मचाऱ्यांची सुद्धा महापालिका क्षेत्रात मोठी मदत मिळाली आहे. सांगली आणि मिरजेतील काही भागात महापुराची परिस्थिती उद्भवल्यानंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तातडीच्या उपाय योजनांवर अधिक भर दिला.
याचबरोबर पूर ओसरल्यानंतर तातडीच्या आरोग्यविषयक खबरदारीसुद्धा घेण्यात आली. यामध्ये ज्या भागात पूर ओसरेल आशा ठिकाणी तातडीची औषध फवारणी , धूर आणि पावडर फवारणी करण्याचे नियोजन केले. याचबरोबर बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी, सोलापूर आदी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सांगली आणि मिरजेतील पुरबाधित भागात तातडीने स्वच्छता हाती घेतली. यासाठी अन्य महापालिकेच्या १०५ आणि महापालिकेच्या ४०० कर्मचाऱ्यांसह स्वच्छतेची यंत्रणा पुरभागात लावून कचरा उठाव आणि स्वच्छतेची मोहीमच हाती घेतली. यामध्ये २८ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत पुरपट्ट्यातील भागातून साडेचार हजार टन कचरा उचलण्यात आला आहे. यासाठी साधारण साडे पाचशे स्वच्छता कर्मचारी, ५८ वाहने यांच्या मदतीने पुरबधित भाग कचरामुक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *