Wed. Aug 10th, 2022

अंधश्रद्धेच्या संशयातून बीडमध्ये विद्यार्थ्याचा बळी

बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धनराज सपकाळ या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी रत्नागिरी (ता.बीड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. शिवाय या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बीड तालुक्यातील नेकनुरपासुन जवळच असलेल्या रत्नागिरी येथील धनराज मोतीराम सपकाळ (वय 6) हा नेहमीप्रमाणे बहिणीसोबत शाळेत गेला होता. साडेअकराच्या सुमारास सर्व विद्यार्थी शाळेच्या परिसरात खेळत होते मात्र धनराज सपकाळ हा या आवरात न दिसल्यानं त्यांची शोधा शोध केली त्यानंतर एक धक्का सर्वांना बसला शाळेच्या आवारात धनराज हा मृत अवस्थेत आढळुन आला.

त्यानंतर पोलिसांना या परिसरात बोलविण्यात आलं. या प्रकरणाची कल्पना देऊन नेमकं धनराजसोबत झालं का? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पोलिसाच्या तपासातून या घटनेच्या मागचं सत्य बाहेर आलं आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला. त्यानंतर सपकाळ यांच्या भावकीतील रोहिदास नवनाथ सपकाळ व देवईबाई रोहिदास सपकाळ या दाम्पत्याला ताब्यात घेतले. यावेळी या दोघांनीही जुन्या भांडणातून ‘ त्या ’ बालकाचा खून केला असल्याचं सांगितलं जातं आहे. आमच्या म्हैसला करणी करून तिला ठार मारण्यात आले होते आणि त्याचा बदला म्हणून आम्ही त्याला ठार मारले असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. रोहिदास सपकाळ यांचं घर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असून बुधवारी धनराज शाळेला आला होता . त्यानंतर धनराज उचलून रोहिदास यांने स्वत: च्या घरामध्ये नेले आणि तिथेच त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आणून ठेवल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.