माझं राज्य दुष्काळात, विजयाचा जल्लोष नाही – उदयनराजे भोसले

लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून एनडीएला मोठ्या प्रमाणात जनतेने मतं दिल्यामुळे देशात पुन्हा मोदी लाट असल्याचे स्पष्ट झाले आहेत. राज्यातही 48 जागांपैकी युतीला 41 जागा मिळाल्या आहेत. सातारा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा विजय झाला असून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना पराभूत केेले आहे.
उदयराजे भोसले विजयी –
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सेनेचे नरेंद्र पाटील यांना पराभूत केले.
साताऱ्यातून उदयनराजे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
लोकसभा निवडणुकात विजयी झाल्यानंतर अनेकांनी गाजा वाजा करत जल्लोष साजरा केला.
मात्र उदयनराजे भोसले यांनी राज्य दुष्काळात असल्यामुळे गुलाल अंगावर घेणार नाही असं म्हटलं.
माझं राज्य दुष्काळात, मी विजयाचा गुलाल अंगावर घेणार नाही असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यात दुष्काळ असताना लोकं होरपळली आहेत.
त्यामुळे माझ्या विजयाचा जल्लोष साजरा करणार नाही. मी गुलाल अंगाला लावणार नाही.
मी हार गुच्छ स्वीकारणार नाही असे म्हटलं आहे.
यापूर्वी सुद्धा उदयनराजे यांनी पुलवामा हल्ला झाल्यामुळे वाढदिवस साजरा करणार नाही असं पत्रक जारी करून सांगितलं होतं.
माझं राज्य दुष्काळात.
मी विजयाचा गुलाल अंगावर घेणार नाही.
– श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. pic.twitter.com/bVpxxMjz6M— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) May 23, 2019