Thu. Dec 2nd, 2021

रहस्यमयी शिव शक्ती अक्ष… न उलगडलेलं कोडं

भारतात सर्वाधिक मंदिरं जर कोणत्या देवाची असतील, तर ती म्हणजे महादेव शंकराची. भगवान शंकराची शिवलिंग जागोजागी पूजली जातात. देशभरात विविध ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. भाविकांची या मंदिरांमध्ये दर्शनासाठी रीघ लागते. मात्र त्याव्यतिरिक्तही अनेक प्राचीन मंदिरं भाविकांनी ओसंडून वाहत असतात. यातीलकाही मंदिरं हजारो वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहेत. या मंदिरांतून भारतीय स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नमूना पाहयला मिळतो. मात्र देशभरातील विविध ठिकाणची 5 प्राचीन शिवमंदिरं मात्र अजूनही एक चमत्कार मानली जातात. कारण ती मंदिरं देशाच्या विविध भागांत आहेत. मात्र तरीही एकाच रेषेत आहेत.

उत्तराखंडातील केदारनाथपासून ते दक्षिण भारतातील समुद्रालगतच्या रामेश्वरपर्यंतची 5 शिवमंदिरं एकाच रेषेत असल्याचं आढळून आलं आहे. भूगोलात आपण अक्षांश, रेखांश शिकलो आहोत. पण त्याच्याही हजारो वर्षं आधी भारतात अशी अक्ष रेषा पूर्वजांना ज्ञात कशी होती, हे कोडंच आहे.

उत्तराखंडातील केदारनाथ,

तेलंगणामधील कालेश्वरम,

आंध्र प्रदेशातील कालहस्ती,

तामिळनाडूतील एकंबरेश्वर

आणि रामेश्वर मंदिर

ही सारी मंदिरं एकमेकांपासून अनेक मैल दूर आहेत. विविध राज्यांत आहेत आणि विविध काळात बांधली आहेत. ही सर्व मंदिर महादेव शंकराची आहेत. मात्र यापेक्षाही एक अजब साम्य या मंदिरांमध्ये आहे. 79° E 41’54” याच सरळ भौगोलिक रेषेत या मंदिरांचं बांधकाम झालं आहे.

सुमारे चार हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या मंदिरांचं एका रेषेत असण्यामागचं कारण योग विज्ञान असल्याचं म्हटलं जातं. अक्षांश रेखांशांसाठी त्या काळात कोणतीही उपग्रह यंत्रणा नव्हती. अशा परिस्थितीत एवढ्या विशाल भूभागावर एकाच रेषेत 5 विविध मंदिरं कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारावर स्थापन केली गेली हे अजूनही वैज्ञानिकांना समजलेलं नाही.

केवळ ही 5 मंदिरंच नव्हे, तर तामिळनाडूनतील श्री थिल्लई नटराज मंदिर, श्री जम्बुकेश्वर मंदिर, श्री अरुणाचलेश्वर मंदिर ही मंदिरंही याच शिव शक्ती अक्ष रेषेत आहेत.

केदारनाथपासून रामेश्वरपर्यंतचं अंतर 2383 किमी आहे. ही मंदिरं 4 ते 5 हजार वर्षांपूर्वी बांधली गेली आहेत. तरीही सर्व मंदिर एकाच रेषेत आहेत. या रहस्यमयी रेषेला शिव शक्ती अक्ष म्हटलं जातं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *