Sun. Feb 28th, 2021

N-95 मास्कच्या किंमतीत मोठी कपात

एन 95 मास्क आता 19 ते 49 रूपये तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क 3 ते 4 रूपयांना…

कोरोना विषाणूने जगभरात तसेच भारतातही हाहाकार घातलाय याच पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी करण्यात आली होती. परंतू कोरोनाचे पडसाद अजूनही नष्ट होताना दिसत नाहीत.
कोरोना विषाणूची लागण न होण्यासाठी मास्क हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि सॅनिटाइजर मुबलक किंमतीत उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आलेले आहे.


मात्र आता राज्य सरकार ने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. टाळेबंदी दरम्यान एन 95 (N 95) ह्या मास्क ची किंमत 200 ते 400 रूपये इतकी होती. परंतु राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि सॅनिटाइजर कमी किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी एन 95 मास्क आता 19 ते 49 रूपये तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क 3 ते 4 रूपयांना मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवर च्या माध्यमातून सांगितले आहे.


कोरोना विषाणू पासून बचावासाठी राज्य सरकार मास्क आणि सॅनिटाइजर यांचा वापर करावा असे आवाहन वेळोवेळी करत आलेले आहे. तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई देखील करत आलेले आहेत. परंतु मास्क सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात उपलब्ध झाले पाहिजे यासाठी हा निर्णय घेतला आहे. विविध दर्जा च्या मास्क ची विक्री किंमत मर्यादा ही साथरोग कायदा अंमलात असे पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे मास्कच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणा-या हव्या यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही मान्यता दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *