Fri. May 7th, 2021

एन. व्ही. रमणा यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

न्यायमूर्ती नथालापती व्यंकट उर्फ एन. व्ही. रमणा यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली असून ते देशाचे ४८ वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमणा यांना राष्ट्रपती भवन येथे सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. या शपथविधीला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी,तसेच सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्ती उपस्थित होते.देशाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे हे २३ एप्रिलला निवृत्त झाले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाल पुढील १६ महिने असणार आहे.

एन. व्ही. रमणा यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील कृष्णा या जिल्ह्यात पोन्नावरम या गावात झाला. एनव्ही रमणा यांनी १९८३ साली आपल्या वकिलीची सुरुवात केली. त्यांनी केंद्र सरकारसाठी अतिरिक्त स्थायी वकील तसेच केंद्रीय प्रशासनिक अधिकरणामध्ये रेल्वेसाठी स्थायी वकील म्हणून काम केलं आहे. २००० साली ते आंध्र प्रदेशच्या स्थायी न्यायालयाचे न्यायाधीश बनले. २०१३ साली दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २०१४ साली रमणा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम सुरु केलं.

जम्मू काश्मिरला इंटरनेट सुविधा पुन्हा देण्याचा, त्याचप्रमाणे सरन्यायाधीशांचे कार्यालय माहितीच्या अधिकाराच्या कायद्याखाली आणण्याचा जो निर्णय देण्यात आला, तो निर्णय देणाऱ्या बेन्चमध्ये एनव्ही रमणा यांचा समावेश होता.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *