‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या
नागपुरात इंजीनियरिंगच्या 18 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, सौरभ नागपूरकर असं विद्यार्थ्याचं नाव असून त्याने 2 महिन्यांपूर्वी रस्त्यावर एका लहान मुलाचा अपघात डोळ्यांदेखत पाहिल्यानं त्याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं.
याच काळात स्वत: सौरभचाही 2 वेळा अपघात झाला होता त्यामुळे या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता त्यानंतर त्याने गळफास घेत आपलं जीवन संपवलं.
तो अपघात सतत माझ्या डोळ्यासमोर येतो, अपघातग्रस्त मुलगा मला बोलावतो म्हणून मी आत्महत्या करत आहे असं त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहलं आहे.