Sun. Jun 13th, 2021

जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये केबल कार दरीत कोसळली; मृतांमध्ये नागपुरातील अंड्रसकर कुटुंबातील चौघांचा समावेश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जम्मू काश्मीरमधील गुलमर्गमध्ये रविवारी केबल कारचा टॉवर पडल्याने 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

 

मृतांमध्ये नागपुरातल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. जयंत अंद्रासकर, त्यांची पत्नी अनघा आणि दोन मुलींचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

 

या घटनेने नागपुरातील जुना सुभेदार ले-आऊट परिसरात शोककळा पसरली. गुलमर्ग आणि गोंडोला दरम्यान पर्यटकांची ने-आण करण्यासाठी तारेवर चालणारी केबल कार

बसविलेली आहे.

 

यात हे कुटंब बसलं होते. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक मोठे झाड उन्मळून केबल कारच्या तारेवर पडलं आणि वजनाने ती तार तुटली.

 

तार तुटल्याने तिच्यावरून पुढे सरकणारी केबल कारही दरीत कोसळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *