Wed. Aug 4th, 2021

नागपुरात पर्यावरण पूरक पितळेचा बाप्पा

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

गणेश उत्सवात गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतात. दरवर्षी गणेशोत्सव मंडळे वेगवेगळ्या प्रकारातील डेकोरेशन्स करुन

भाविकांचे लक्ष केंद्रित करतात. काही ठिकाणी इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे संदेश दिले जातात.

 

 

नागपुरातील पर्यावरण पूरक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई गणेशोत्सव मंडळाने यंदा आकर्षक गुफेचा देखावा

तयार केला असून 250 किलो वजनाची पितळेच्या मूर्तीची स्थापना केली आहे. ही मूर्ती अलिगड वरून मागविण्यात आली आहे.

 

नागपुरातील जलस्रोत प्रदूषित होणार नाही याची काळजी घेत घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था मंडळाकडून केली

जाते. तसेच बाप्पाच्या पूजेसाठी हार, फुलं न आणता एक वही आणि एक पेन अर्पण करण्याचं आव्हान मंडळाने केले आहे.  त्यामुळे

नागपुरातील भाविकांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *