Mon. Jul 6th, 2020

नागपूर – टोळापार येथे गॅस्ट्रोचे थैमान

जय महाराष्ट्र न्युज, नागपूर

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील टोळापार येथे गॅस्ट्रोने थैमान घातले असून आतापर्यत टोळापार येथील 182 नागरिकांना गॅस्त्रोची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी पाच रुग्णांवर टोळापार येथे तर 23 रुग्णांवर नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर गॅस्ट्रोग्रस्त रुग्णांची संख्या जास्त असल्याने इतर रुग्णांना गावातील शाळेतच उपचार दिला जात आहे पण तेथे देखील बेडच्या अभावामुळे रुग्णांना जमिनीवर सतरंजी टाकून उपचार घ्यावा लागत आहे.

खबरदारी म्हणून गॅस्ट्रोग्रस्त रुग्णांच्या कुटुंबीयांना सुध्दा रोग प्रतिबंधक औषध देण्यात आल्याची माहिती यावेळी तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली. उपयोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने गावातील पाणी पुरवठा पुर्णपणे बंद करण्यात आला असुन पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गावात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही अनेक ठिकाणावरुन फुटली होती ती सुध्दा तात्काळ दुरुस्त करण्यात आली आहे.तसेच टोलापार गावाचे पाण्याचे नमुने हे प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पिण्यासाठी पाणी वापरण्याचा सल्ला डॉक्टर देणार आहे.

तो पर्यत टॅकरने येत असलेले पाणीच नागरीकांनी प्यावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य बघता चार दिवसांपासून येथे आरोग्य विभागाचे अधिकारी व डॉक्टर टोळापार व नरखेड येथील ग्रामिण रुग्णालयात तळ ठोकुन बसल्याचे पाहायला मिळत आहे. या भागातील स्थानिक नेत्यांच्या गावाला भेटी देणे देखील सुरु झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *