नागपुरातील अनेक सरकारी कार्यालयांवर धाड; बनावट स्टॅम्प पेपर, शिक्के आणि महत्वाची कागदपत्रे हस्तगत
जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपूर गुन्हे शाखेनं नागपूरमधील अनेक सरकारी कार्यालयात धाड टाकून अनधिकृत वेंडरला ताब्यात घेतले.
जवळपास 63 लोकांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून बनावट स्टॅम्प पेपर, शिक्के आणि महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.
नागपूरमधील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, प्रशासकीय इमारत 1, नागपूर महानगरपालिका आणि नागपूर तहसील कार्यालयात ही कारवाई
करण्यात आली.