Wed. Jan 19th, 2022

नागपूर तुरुंगातील पॅरोल, फर्लोवर गेलेले 50 गुन्हेगार फरार

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूर कारागृहातील पॅरोल आणि फर्लोवर असलेले 50 गुन्हेगार फरार झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सुट्टी संपूनही हे गुन्हेगार परतले नाही. एक वर्ष शिक्षा भोगल्यानंतर कैद्याला 28 गिवस सुट्टी मिळण्याचा अधिकार आहे, तर आकस्मिक कारणासाठीही परवानगीनं सुट्टी मिळते.

 

या सुट्टीच्या काळात त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागते. मात्र, नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर असलेले 36 आणि फर्लोवर असलेले 14 गुन्हेगार फरार झाले. यात मोक्का कायद्यान्वये शिक्षा झालेल्या सौरभ कडलग आणि केतन शंभरकर यांचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *