Wed. Apr 14th, 2021

लवकरच शिवाजी महाराजांची ‘महागाथा’प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रसिद्ध

देशासह राज्यभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्श्क नागराज मंजुळे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी एक ३० सेकंदाचा टीझर प्रसिद्ध केला आहे.

ट्विटमध्ये काय म्हटलंय ?

एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित.

आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी, असं ट्विट नागराज मंजुळे यांनी केलं आहे.

तसेच नागराज मंजुळे यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या सदिच्छा देखील दिल्या आहेत.

शिवरायांची महागाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एकूण ३ सिनेमे बनवण्यात येणार आहे .

नागराज मंजुळे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

तर रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असणार आहे. तसेच प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल हे या सिनेमाला संगीत देणार आहेत.

नागराज मंजुळे यांचा हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता आता प्रत्येक शिवप्रेमींना लागून राहिली आहे.

दरम्यान नागराज मंजुळे यांचा आगामी ‘झुंड’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नागराज मंजुळे यांनी याआधी फॅंड्री, सैराट सारखे जातीव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

आपल्या सिनेमामध्ये नवख्यांना संधी देण्यासाठी ते ओळखले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *