‘कोल्हेंनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न’ – नाना पाटेकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. नथुरामाच्या भूमिकेवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नथुरामाच्या भूमिकेवरून अमोल कोल्हे यांचे समर्थन केले आहे.
‘नथुराम गोडसेची भूमिका साकारणे म्हणजे त्याच्या प्रवृत्तीचे समर्थन करणे नाही’, अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडेसेची भूमिका स्विकारणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. गोडसेची भूमिका साकारणे म्हणजे त्यांचे समर्थन करणे असे नाही. अमोल कोल्हे यांनी एक कलाकार, अभिनेता म्हणून ही भूमिका स्विकारली आहे. त्यामुळे अशा छोट्या गोष्टींना महत्व न देता, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करा’, अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी दिली आहे.
‘भूमिकेकडे कलाकार म्हणून पहा’ – शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेंनी साकारलेल्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, ‘अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून भूमिका साकारली आहे. त्यामुळे नथुरामाच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पहायला हवे’, असे शरद पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले, ‘कलावंत म्हणून मी सर्वच कलाकारांचा सन्मान करतो. याआधी महात्मा गांधी यांच्यावर जो सिनेमा प्रदर्शित झाला होता, त्या सिनेमात कोणीतरी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली होती. ती भूमिका करणारा नथुराम गोडसे नव्हता, तर कलाकार होता. त्यामुळे एखादी भूमिका साकारताना त्याच्याकडे कलाकार म्हणून पाहयला हवे’, अस ते म्हणाले.
भूमिकेबाबत काय म्हणाले अमोल कोल्हे?
‘२०१७मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यावेळी मी राजकारणात सक्रीय नसताना ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका साकारणे म्हणजे त्यांच्या विचारधारेसोबत सहमत झाले, असे नाही. तसेच काही विचारधारांसोबत अहसमत असतानाही ती भूमिका स्विकारली जाते. माझ्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात नुथराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही’, असे अमोल कोल्हे म्हणाले.
You completed various nice points there. I did a search on the subject and found a good number of people will consent with your blog.