Wed. Apr 21st, 2021

नाना पटोले विधानसभेचे नवे अध्यक्ष महोदय

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ही घोषणा केली. यासह नाना पटोले हे विधानसभेचे 15 वे अध्यक्ष ठरले आहेत.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी नाना पटोलेंना सन्मानाने अध्यक्ष पदाच्या खुर्चीजवळ नेले. 

भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी किसन कथोरे यांनी अर्ज केला होता. पण त्यांनी अर्ज मागे घेतल्याने नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नाना पटोले हे विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 

दरम्यान शनिवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पार पडला. यात महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी पाठिंबा दिला . तर 4 सदस्यांनी तटस्थांची भूमिका घेतली. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी भाजप सदस्यांनी सभात्याग केल्याने विरोधात एकही मतदान झाले नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *