Fri. Aug 12th, 2022

नाणार रिफायनरी प्रकरणी शिवसेनेची भूमिका बदलली ?

कोकणातील नाणारा रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेच्या भूमिकेत बदल झालाय का, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. त्याला कारण ही तसंच आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून १५ फेब्रुवारीच्या दैनिकात नाणारची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहीरातीमुळे शिवसेनेच्या भूमिकेत बदल झालाय का, तसेच आपल्या भूमिकेवरुन शिवसेनेने घूमजाव केलाय का, असा सवाल आता नाणारवासीयांना तसेच राज्यातील जनतेला पडला आहे.

सामना वृत्तपत्राच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्या पानावर ही जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

काय आहे जाहीरातीमध्ये ?

रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासीयांच्या उन्नतीसाठीच, असं ठळक अक्षरात लिहिलेलं दिसत आहे.

या जाहीरातीतील काही मुद्दे

  • नाणार प्रकल्पामुळे स्थानिक मुलांसाठी अत्याधुनिक शिक्षणाच्या सुविधा
  • लाखो लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार
  • किमान २० हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना थेट रोजगार
  • या प्रकल्पामुळे कोकणवासीयांचे भविष्य उज्जवल होणार, असंही या जाहीरातीत म्हटंल आहे.
  • आधुनिक शिक्षण आणि रोजगारामुळे कोकणवासियांच्या स्थलांतर थांबेल, असा दावाही या जाहीरातीत केला आहे.
  • तसेच या प्रकल्पामुळे कोकणभूमीचे सुवर्णसंधीमध्ये रुपांतर होणार असल्याचंही या जाहीरातीत सांगितलं आहे.

राज्यात महायुतीचं सरकार असताना शिवसेनेनी नाणार प्रकल्पविरोधी भूमिका घेतली होती. पण आता सत्तेत असताना शिवसेनेची नाणार प्रकरणाबद्दल असलेली भूमिका बदलली का असा सवाल केला जात आहे.

हा विनाशकारी प्रकल्प कोकणमध्ये होउ दिला जाणार नाही. कोकणच्या मातीत आमची रक्ताची नाती जोडलेली आहेत. हा प्रकल्प इतका चांगला असले तर गुजरातला घेऊन जा.

हा प्रकल्प इथं लादू नका, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षी एप्रिल महिन्यात नाणारमध्ये झालेल्या सभेत केलं होतं.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी महाआघाडीचं सरकार आल्यानंतर उद्नाधव ठाकरे यांनी नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.