Wed. Feb 19th, 2020

….अखेर कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द

कोकणातील  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील चौदा गावांच्या परिसरातील साधारण साडेपाच हजार हेक्टर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोन गावांतील सुमारे सहाशे हेक्टर जमीन संपादित करण्यात येणारा नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे.

नाणार प्रकल्पासाठी निघालेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे.

अशी माहीती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली आहे.

सध्या जरी हा प्रकल्प रद्द झाला असला तरी जिथे स्वागत होईल तिथे हा प्रकल्प सुरू केला जावू शकतो असे ही यावेळी त्यांनी सांगितले आहे.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे दहा वर्षांहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे.

जैतापूरपासून जेमतेम पंधरा किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे, म्हणजे भविष्यातील धोका अनेक पटींनी वाढणारा आहे.

यामुळे या प्रकल्पाला विरोध केला जात होता. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सौदी अरेबियातील सौदी आराम्को कंपनी या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणार होती.

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांची ५० टक्के भागीदारी असणार होती.

 नाणार प्रकल्प रद्द का?

नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध

नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, निसर्गाची हानी होण्याची शक्यता

शिवसेनेचा कोकणातील जनतेच्या बाजूने भूमिका घेत या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध

प्रकल्पामुळे देवगड हापूसचा संपूर्ण पट्टाच नाहीसा होण्याची भीती

दरवर्षी होणाऱ्या दोन ते अडीच लाख पेट्यांच्या आंबे उत्पादनाला फटका

प्रकल्पामुळे समुद्रात संबंधित बोटींची वाहतूक वाढल्याने मच्छिमारांना फटका

आंबा, मच्छिमारी आणि पर्यटन या तिन्हींवर परिणाम करणारा प्रकल्प

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *