Wed. Aug 10th, 2022

राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला शुक्रवारपासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान कणकवली येथील सभेत राणे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याने भाजपा- शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्त्यांवर, तर भाजपचे माजी खासदार निलेश राणे, नितेश राणे यांच्यासह ५० ते ६० व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा १३५, १८८, १४३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पोहोचली आहे.

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली. त्यावेळी कणकवलीत राणेंचं जंगी स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन त्यांनी आपली यात्रा सुरु केली. आशिष शेलार आणि विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरही नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झालेत. यावेळी राणेंनी एसटी कामगारांच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.