…अखेर नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन
कणकवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत स्वाभिमान पक्षाच विलीनीकरण करण्यात आलं. यावेळी नारायण राणे तसेच स्वाभिमानचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

कणकवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत स्वाभिमान पक्षाच विलीनीकरण करण्यात आलं. यावेळी नारायण राणे तसेच स्वाभिमानचे कार्यकर्ते उपस्थीत होते. कोकणच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केला असं मत यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. स्वाभिमान पक्ष झाला भारतीय जनता पार्टीत विलीन झाला. जिल्ह्याचा विकास व्हावा हाच ध्यास मनात घेऊनच भाजप पक्षात प्रवेश केला आहे. असं मत यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
एकूण मतदानाच्या 60ते 65% मतदानाने नितेश राणे विजयी होणार आहेत.
कोकणही टँकरमुक्त करू तसेच सी वर्ल्डचा प्रकल्प मार्गी लावू
आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या असून कोकणाचाही विकास करू
राज्यात आघाडीचे 24 जागा निवडून येतील.
मुंबई- गोवा महामार्ग पर्यटनासाठी उपयुक्त ठरेल
नव्या आमदारांना राणेंनी नेहमीचं प्रोत्साहन दिलं आहे.
राणेंनी आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आहे.
नितेश राणेंनी संयमाचे धडे घ्यावेत
नारायण राणेंनी एक काळ गाजवला