नरेंद्र पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबईत मनसेचे महाअधिवेशन सुरु आहे. यातच मनसेला मोठा धक्का लागला आहे. नरेंद्र पाटील यांनी मनसेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
नरेंद्र पाटील यांनी आज उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळा जयंत पाटील उपस्थित होते. प्रक्षप्रवेशाची माहिती अजित पवार यांनी ट्विट द्वारे दिली.
नरेंद्र पाटील यांना मनसेने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती.
नरेंद्र पाटील हे शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
नरेंद्र पाटील हे स्वर्गीय शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र आहेत. धर्मा पाटील यांनी २ वर्षापूर्वी मंत्रालयात विष प्राषाण करुन आत्महत्या केली होती.
धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी २०१८ ला मंत्रालयात विष प्राषाण केले होते.
यानंतर ६ दिवसांनी म्हणजेच २८ जानेवारीला मृत्यू झाला होता..
नक्की प्रकरण काय ?
आपल्या अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबादला मिळावा यासाठी धर्मा पाटील ३ महिन्यांपासून खेटा मारत होते.
परंतु सरकारच्या गलथान काराभारामुळे त्यांनी विष पिऊन आपले जीवन संपवले.
दरम्यान नरेंद्र पाटील यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे, याबद्दल कोणतीही घोषणा राष्ट्रवादी तर्फे केली गेलेली नाही.