Fri. Feb 21st, 2020

पंतप्रधान पीक विमा योजनेतून राज्याला तातडीनं मदत देणार – पंतप्रधान

शिर्डीतील साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप आज पंतप्रधान मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटात आहे आणि या संकटाच्या काळात केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करणार अशी घोषणा आज पंतप्रधानांनी केली आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेतून राज्याला तातडीने मदत करणार असल्यांचं आश्वासनही पंतप्रधानांनी शिर्डीत दिले आहे.

शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आहे, तसेच यावेळी पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे वाटप करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते 10 जणांना प्रातिनिधीक स्वरुपात घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे, यावेळी मोदींनी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मराठीतून संवाद साधला आहे.

शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध उपक्रमांचं भूमिपूजन केलं, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राकडून मदत मिळेल अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर व्यक्त केली.

शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महिलांना घरांच्या चाव्यांचं वाटप केलं, यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना 2019 पर्यंत घरं उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं आहे.

मोदींनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला घरं उपलब्ध करुन देण्याचं सांगितल आहे, पण महाराष्ट्रात 2019 पर्यंतच घरं उपलब्ध करुन देण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

 • पंतप्रधान पीक विमा योजनेतून राज्याला तातडीनं मदत देणार – पंतप्रधान
 • महाराष्ट्रात पाऊस कमी झालाय – पंतप्रधान 
 • महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याच्या संकटातून बाहेर पडण्याचं काम केलं आहे – पंतप्रधान
 • जलयुक्तच्या कामातून 16 हजार गावं दुष्काळमुक्त – पंतप्रधान
 • दुष्काळ मुक्त करण्यासाठी काम केलं आहे – पंतप्रधान
 • महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन – पंतप्रधान
 • शेतीसोबत सरकार पर्यटनालासुध्दा महत्व देण्यात येतं आहे – पंतप्रधान
 • सर्व मुलभूत सुविधांकडे लक्ष दिलं जात आहे – पंतप्रधान
 • पण आमच्या मागच्या चार वर्षात 1 करोड 25 लाख घरं बनवली – पंतप्रधान
 • मागच्या सरकारने 4 वर्षात फक्त 25 लाख घरं बनवली होती – पंतप्रधान
 • हगणदारीमुक्त योजनेत महाराष्ट्राचं काम उल्लेखनीय – पंतप्रधान
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल 
 • घर बांधणीसाठी सरकारी मदत 50 हजारांनी मदत वाढवली – पंतप्रधान  
 • आधीच्या सरकारनं फक्त 25 लाख घरं बांधली – पंतप्रधान 
 • 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देणार – पंतप्रधान
 • अडीच लाख लोकांना हक्काचं घर देण्याचं भाग्य लाभलं – पंतप्रधान 
 • 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देणार – पंतप्रधान
 • अडीच लाख लोकांना हक्काचं घर देण्याचं भाग्य लाभलं – पंतप्रधान 
 • गरिबांच्या कल्याणकारी योजनेसाठी शिर्डिशिवाय दुसरी जागा नाही – पंतप्रधान
 • पंतप्रधानांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या 
 • तुमचं प्रेम हेच माझं सामर्थ्य, त्यातून ऊर्जा मिळते – पंतप्रधान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *