Fri. Jan 21st, 2022

सागरी सुरक्षेच्या मुद्द्यावरील चर्चेचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. ‘Enhancing Maritime Security – A Case for International Cooperation’ या सागरी सुरक्षेशी संबंधित खुल्या चर्चेचे आयोजन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत असलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘समुद्री सुरक्षा वाढवणे – आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक कार्यक्रम’ या विषयावरील उच्चस्तरीय खुल्या चर्चेचे अध्यक्ष असणार आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी ही बैठक भारतीय वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होईल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, नायजेरिया, केनिया, व्हिएटनामचे राष्ट्रप्रमुख आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन या चर्चेत सहभागी असणार आहेत. सागरी गुन्हेगारी आणि असुरक्षिततेसोबत प्रभावीपणे लढण्यासाठी आणि सागरी क्षेत्रात समन्वय मजबूत करण्यासाठी या चर्चेवर लक्ष केंद्रित केले जाईल.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२१ पासून सुरू झाला होता. अस्थायी सदस्य म्हणून २०२१-२२ या कालावधीत ऑगस्ट महिन्यात मिळणारे भारताचे पहिले अध्यक्षपद असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *