Thu. May 19th, 2022

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं वाटत नाही – शरद पवार

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं वाटत नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

भाजपा हा पक्ष लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा पक्ष ठरेल. मात्र भाजपाला सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

इतकेच नाही तर नरेंद्र मोदी तुम्हाला राजकीय गुरु मानतात का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की मोदी कोणाचा सल्ला घेत नाहीत. ते कायम आपली 56 इंच छाती दाखवत असतात असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर लहान उद्योजकांचं कंबरडं मोडलं आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.

या निर्णयाची किंमत भाजपाला मोजावी लागेल असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

एवढचं नाही तर भाजपाची ज्या राज्यांमध्ये 10 वर्षे सत्ता होती अशा ठिकाणीही भाजपाची सत्ता आता नाही.

देशातली अशीच स्थिती निर्माण होईल असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन काम करत आहोत. आम्हाला शेकाप मदत करत आहे.जोगेंद्र कवाडेही आम्हाला सहकार्य करत आहेत.

हे सर्व एकत्रित काम करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासोबत सकारात्मक आमची चर्चा झाली आहे.

काँग्रेसची चर्चा झाल्यानंतर आमची एकत्रित चर्चा होईल असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.