Tue. Oct 20th, 2020

5 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य- नरेंद्र मोदी

आम्ही भारताची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सचं ध्येय गाठण्याच्या दिशेने पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे. आपण पुढील पाच वर्षांत आपण 5 लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथील जाहीर सभेत दिली आहे.

Size of the cake matters- मोदी

कालच्या अर्थसंकल्पानंतर तुम्हालाही भारताच्या 5 लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या ध्येयाबाबत समजलं असेल.

सध्या सर्वत्र याचीच चर्चा होत आहे.

आजही काहीजण भारताच्या सामर्थ्यावर शंका व्यक्त करत असतात.

भारत एवढी मोठी उंची गाठू शकत नाही, असं त्यांना वाटतंय.

म्हणूनच आम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

Size of the cake matters या म्हणीप्रमाणे केकच्या आकारावर त्याचा मिळणारा तुकडाही मोठा असतो.

म्हणूनच देशाची अर्थव्यवस्था जर 5 लाख कोटी डॉलर्सपर्यंत नेली, तर सर्वांना त्याचा फायदा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *