‘नार्वेकर नवे शिवसेनाप्रमुख झालेत?’ – नारायण राणे

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत बाबरी मशीद पाडण्यासाठी जमाव मशिदीवर चढताना दिसून येत आहे. तसेच त्यांनी या फोटोवर लिहिले की, ‘राम मंदिराच्या निर्मितीसाठी शिवसैनिकांनी दिलेल्या बलिदानाला कोटी कोटी नमन’ असे त्यांनी लिहिले. नार्वेकरांचे हे ट्विट मात्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. नार्वेकर यांच्या ट्विटमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नार्वेकरांवर हल्लाबोल केला आहे.
‘मिलिंद नार्वेकर नवे शिवसेनाप्रमुख झाले आहेत का?’ अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी नार्वेकरांनी केलेल्या ट्विटमुळे राणे आणि फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर ट्विटमध्ये म्हणाले की, ‘अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन…’ अशी ओळ त्या फोटोवर लिहिलेली आहे. यावरून नारायण राणे यांनी नार्वेकरांवर हल्लाबोल केला.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 6, 2021
फडणवीस यांनी नार्वेकरांनी केलेले ट्वीट योग्यच आहे. यावर शेजारी उभ्या असलेल्या नारायण राणेंनी फडणीसांना थांबवत नार्वेकर म्हणजे आताचे शिवसेनाप्रमुख का? असा टोला लगावला आहे.