पुन्हा एकदा नासाची चांद्रमोहीम…
या मोहिमेद्वारे चंद्रावर पहिल्यांदाच महिला पाऊल ठेवणार…

अमेरिकेच्या अवकाश संशोधन विभागाने (नासा) आगामी चांद्र मोहीमेसाठी अठरा अंतराळवीरांची नावे जाहीर करण्यात आली आहे. ‘अर्तिमीस (Artemis) मून लँडींग प्रोग्राम’ असं या मोहीमेस नाव देण्यात आलं असून अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रमात आयोजित केला होता आणि यांच वेळी अंतराळवीरांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली.
नासा ही चांद्रमोहीम अंतर्गत पहिल्यांदाच महिला चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. तर पुरुषही पुन्हा एकदा चंद्रावर जाणार आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. १९६० आणि ७० च्या दशकात अमेरिकेने अपोलो मिशनद्वारे चंद्रावर स्वारी केली होती. आता पुन्हा २०२४ साली चंद्रावर जाण्यासाठी नासा काम तयारी करत आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी घोषणा करत म्हटलं, अमेरिकन बंधुंनो, मी तुम्हाला भविष्यातील हिरोंची ओळख करू देतो. जे आपल्याला पुन्हा एकदा चंद्रावर घेवून जातील. हे सर्वजण अर्तिमीस जनरेशनचे आहेत,असे गौरवोद्गार काढले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ठराविक लोकांच्या उपस्थिती नासाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.