Wed. Aug 10th, 2022

नासाने सोशल मीडियावर शेअर केला ‘मिल्की – वे’चा फोटो

अमेरिकन स्पेस एजन्सी NASA हे निरनिराळे मोहिम या अंतराळ राबवत असतात आणि नवनवीन संशोधन करत असतात.त्यामुळे आपल्याला अंतराळबद्दल अनेक माहिती मिळत असते. अनेकदा नासाही त्याच्या वेबसाइटवर आणि सोशल मीडियावर अनेक फोटो अंतराळमधील फोटो शेअर करत असतात. सध्याला नासाने आपल्या आकाशगंगेचा म्हणजेच मिल्की – वे चा एक फारच सुंदर आणि अंतराळातील ऊर्जेचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो मिल्की वे डाउनटाऊनचा आहे. असून या ब्रम्हांडात अनेक हालचाली घडत असतात. या फोटोबाबत सांगितलं गेलं की हे गेल्या दोन दशकांपासून पृथ्वीच्या फेऱ्या मारत असलेल्या चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी द्वारा करण्यात आलेल्या ३७० ऑब्जर्वेशनचा परिणाम आहे. ऑब्जर्वेटरी द्वारे मिल्की वेच्या केंद्रात अब्जो तारे आणि ब्लॅक होल्सचे फोटो काढले. ज्यानंतर हा फोटो समोर आला. या फोटोच्या कंस्ट्रास्टसाठी दक्षिण आफ्रिकेतील एका रेडीओ टेलिस्कोपनेही योगदान दिलं आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ मॅसाच्युसेट्स एमहर्स्टचे संशोधक डॅनिअल वांग शुक्रवारी म्हणाले की, या महामारी काळात त्यांनी घरी राहून हे काम करण्यात एक वर्ष घालवलं. वांग यांनी ई-मेलद्वारे सांगितलं की, या फोटोत आपण जे बघतो आहोत ती आपल्या आकाशगंगच्या डाऊनटाऊनमध्ये होत असलेली हिंसक किंवा ऊर्जावान इकोसिस्टीम आहे. डॅनिअल वांग यांनी पुढे सांगितले, आकाशगंगेच्या केंद्रात बरेच सुपरनोवा अवशेष, ब्लॅक होल्स आणि न्यूट्रॉन तारे आहेत. प्रत्येक एक्स-रे किंवा बिंदू किंवा विशेषता एक ऊर्जावान स्त्रोताचं प्रतिनिधित्व करतो. ज्यातील जास्तीत जास्त केंद्रात आहेत. वांग यांनी याचा हा रिपोर्ट रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या मॅगझिनच्या जूनच्या अंकात प्रकाशित केला जाणार आहे. चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरीला १९९९ मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. तो आता पृथ्वीच्या फेऱ्या मारत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.