Mon. Sep 20th, 2021

नाशिकमध्ये बिबट्याचा 6 जणांवर हल्ला

नाशिकमधील बिबट्याचे हल्ले सुरूचं आहेत. रविवारी दुपारी नाशिकमधील इगतपुरी येथील आशाकिरण येथे रविवारी दुपारी बिबट्याने ग्रामस्थांवर केला या हल्ल्यात ५ ग्रामस्थ आणि १ वन परिक्षेत्रअधिकारी जखमी झाले आहेत. या ६ रुग्णांवर रविवारी सायंकाळपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.त्यांना खोलवर जखमा झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. हल्ल्यानंतर बिबट्या पळून गेला असून, बिबट्याला जेरबंर करण्यासाठी नाशिक येथून वन विभागाचे रेस्क्यू पथक रवाना झाले आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू पथक गस्त घालत आहे.दरम्यान गेल्या दोन महिन्यात वारंवार बिबट्याचा हल्ला झाला आहे.

गेल्या दोन महिन्यात बिबट्याचा वावर

17 फेब्रुवारीला नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात नागरीवस्तीत बिबट्या शिरला. आर्किटेक्ट कॉलनीतील एका बंद बंगल्यात बिबट्या दोन तास दब धरून बसला होता. त्यानंतर परिसरातील पाटील एका बंगल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या शेड मध्ये जवळपास दीड तास हा बिबट्या बसला होता.

20 फेब्रुवारीला ठाण्यातील एका मॉलमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली. या घटनेने एकचं खळबळ उडाली होती. मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात बिबट्या आला होता. ही बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या जय महाराष्ट्रचे कॅमेरामन तबरेज शेख यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने ते जखमी झाले होते.

25 फेब्रुवारीला कळवण येथील गोसराणे शिवारातील विश्वास मोरे यांच्या उसाच्या शेतात बिबट्याचे 3 बछडे आढळले.याच भागात बिबटया मादीचं दर्शन झालं होतं.

9 मार्च रोजी नाशिक जिह्यातील दिंडोरीच्या माथेरेवाडी गावात देविदास जाधव या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला झाला.शेतात काम करत असताना अचानक हल्ला केल्याने देविदास गंभीर जखमी झाले होते.

10 मार्च रोजी रविवारी दुपारी नाशिकमधील इगतपुरी येथील आशाकिरण येथे रविवारी दुपारी बिबट्याने ग्रामस्थांवर केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *