Sun. Oct 17th, 2021

नाशिकच्या गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक शहर परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे गोदावरी नदी मात्र दुथडी भरुन वाहत आहे.

 

नदीच्या बाजुला असलेली भाजी मंडई पाण्याखाली गेली. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकच्या अनेक जिल्ह्यांमध्येही पावसानं दमदार

हजेरी लावली.

 

त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. इगतपुरीत तब्बल 195 मिलीमिटर तर त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

 

नाशिक जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये 100 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला. पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

 

कारण दुबार पेरणीचं संकट तुर्तास तरी टळल्याचं दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *