… अन् परीक्षा केंद्र पोहचल्यावर विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकमध्ये नीट परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर चुकीचा पत्ता असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.
सीबीएसईच्या घोळामुळे सुमारे 150 ते 200 विद्यार्थांचे भवितव्य टांगणीला लागले. नाशकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर मुंढेगाव असा उल्लेख असल्याने सकाळी अनेक विद्यार्थी
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे पोहोचले.
परंतू तेथे कोणतेही परीक्षा केंद्र नसल्याचे समजल्याने धक्का बसला. त्यांनी धावपळ करुन पत्यातील इतर सुचनांनुसार पेठरोडचे एकलव्य स्कूल येथील परीक्षा केंद्र गाठले. येथे त्यांना उशीरा
परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.