Wed. Jan 19th, 2022

शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकमधून मुंबईकडे रवाना

आज नाशिकमधून लाँग  मार्चला सुरवात झाली आहे.

संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून  शेतकरी आणि आदिवासी बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत काहीच तोडगा न निघाल्याने अखेर  आज लाँग मार्चला सुरवात झाली.

दि.27 फेब्रुवारी  रोजी हा लाँग मार्च मुंबईत धडकणार आहे.

जोपर्यंत  मागण्यांसंदर्भात ठोस लेखी आश्वासन सरकारकडून मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.

या प्रकारची भूमिका किसान सभेच्या नेत्यांनी घेतली आहे.

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा लाँग मार्च मुंबईकडे रवाना झाला आहे.

आंदोलकांच्या मागण्या

 • शेतीमालाला दीडपट हमीभावाचा कायदा करा.
 • शेतकरी आंदोलनांतील पोलिस केसेस मागे घ्या.
 • प्रतिदिन 300 रुपयांप्रमाणे मागेल त्याला रोजगार हमीचे काम द्यावे.
 • नदीजोड प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देण्यात यावी.
 • महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला दिले जाऊ नये.
 • वनहक्कांच्या जमिनींचे दावे निकाली काढावे.
 • जिल्ह्यात सुमारे 11 हजार वनजमिनींचे दावे शासनाने निकाली काढावे.
 • वृद्धापकाळ पेन्शन योजनेची रक्कम 600 रुपयांहून दोन हजार रुपये करावी.
 • प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत सर्वांचाच समावेश करावा.
 • वन हक्क कायद्याची अंमलबजावणी आणि स्वामीनाथन आयोग लागू करवा.
 • रेशनकार्ड बनवताना येणारे अडथळे दूर करावेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *