Tue. May 17th, 2022

नाशिककरांनो, विना हेल्मेट फिरू नका!

नाशिक शहरात कालपासून दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे सक्तीचे झाले आहे. तसेच विनाहेल्मेट दुचाकीवर फिरणाऱ्या चालकाकडून दंड आकारण्यात आला आहे. नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे आता नाशिककरांनी दुचाकीवर फिरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक झाले आहे.

नाशिकमध्ये कालपासून हेल्मेट सक्ती मोहिम राबवण्यात येत आहे. दरम्यान, याच मोहिमेच्या पहिल्या दिवशी ४५३ नागरिकांकडून २ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच हे नागरिक पुन्हा विनाहेल्मेट आढळल्यास त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यात रुग्णालय, अत्यावश्यक सेवा किंवा कुठेही दुचाकीवरून जा, तुम्हाला हेल्मेट घालणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे नाशिककरांनी दुचाकीवर जाताना हेल्मेट घाला, अन्यथा कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.

नाशिकमध्ये गुरुवारपासून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर थेट दंडात्मक कारवाईला नाशिक पोलिसांकडून सुरुवात केली आहे. यामध्ये विनाहेल्मेट दुचाकीस्वारास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळून आले तर अशा दुचाकीस्वारांना दुप्पट दंड म्हणजेच १ हजारांचा दंड भरावा लागेल शिवाय त्याचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द होणार आहे.

1 thought on “नाशिककरांनो, विना हेल्मेट फिरू नका!

  1. This is my first time I have visited your site. I found a lot of interesting stuff in your blog. From the tons of comments on your articles, I guess I am not the only one! keep up the impressive work.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.