घरफोडी करणाऱ्या हुक्का टोळीला अटक

नाशिक : नाशिक शहरात घरफोडी करणाऱ्या हुक्का टोळीच्या मुंबई नाका पोलिसांनी मूसक्या आवळल्या आहे. यामध्ये पोलिसांनी मोठ्या कसोशीने बाबू अन्सारी, दीपक गायकवाड, वसील अब्दुल रेहमान शेख या तीन आरोपींना जेरबंद करत त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, लॅपटॉप, गॅस सिलेंडर शेगडी, चांदीची भांडी असे जवजवळ 4 लाख 55 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आहेत. या टोळीकडून अजूनही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.