Mon. Apr 19th, 2021

मुख्यमंत्रीपदावरून सेनेची पोस्टरबाजी; नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक

काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्रिपदावरून युतीत मोठा वाद निर्माण झाला. नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्यामुळे वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. सोमवारी भाजपाचे प्रभारी सरोज पांडे यांनी विधानसभेत युतीच असून मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असं म्हटलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री हा शिवसेनाच होईल अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं ?

विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीने निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत भाजपाचे प्रभारी सरोज पांडे यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी युती जरी झाली असली तरी मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वक्तव्य सरोज पांडे यांनी केलं आहे.

सरोज पांडे यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहे.

भाजपा कार्यलयासमोर आणि मुंबईनाका परिसरात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल अशी पोस्टरबाजी केली आहे.

या पोस्टरबाजीमुळे नाशिकमध्ये भाजपा-शिवसेनेत संघर्ष सुरू झाला आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदा संदर्भात गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसेच योग्य वेळ आल्यावर याबाबतीत घोषित करू असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *