नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटर हँडलवर मौनीचे बोल्ड फोटो व्हायरल झाल्यानं उडाली खळबळ
वाचा काय आहे प्रकरण?

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर छाप उमटवून रुपेरी पडद्याकडे वळलेल्या अभिनेत्री मौनी रॉय ही नेहमीच चर्चेत असते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मौनीचे शेअर केले गेले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नेहमीच अर्थव्यवस्था, गुंतवणूक, बाजारपेठेतील ट्रेंड या संबंधीत पोस्ट असतात. मात्र हे फोटो शेअर झाल्यावर खळबळ उडाली आहे. मौनीचे फोटोपाहून तिचे चाहते हैराण झाले आणि त्यांनी एनएसईला ट्रोल केलं. एनएसईने त्यांची बाजू सावरत गैरसोयीबद्दल माफी मागितली. शिवाय आज एनएसई हँडलवरून रात्री १२:२५ वाजता चुकीची पोस्ट करण्यात आली. एनएसईचे ट्विटर हँडल सांभाळणाऱ्या एजन्सीने केलेली ही चूक होती आणि यात कोणतही हॅकिंग वगैरेचा प्रकार नव्हता. आमच्या फॉलोअर्सना झालेल्या गैरसोयीबद्ल आम्ही माफी मागतो”, असं ट्विट करण्यात आलं.