Fri. Apr 23rd, 2021

#InternationalWomensDay:8 मार्चलाच जागतिक महिला दिन का?

जगभरात 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

भारतातही महिला दिनाच्या निमित्तानं निरनिराळ्या क्षेत्रातील उत्तुंग झेप घेतलेल्या महिलांचा गौरव करून सन्मान केला जातो.

त्यांच्या प्रवासाची गाथा जगासमोर आणून महिला वर्गासमोर त्यांचा आदर्श ठेवला जातो.

पहिला महिला दिवस

अमेरिकेमध्ये 28 फेब्रुवारी 1909 रोजी सर्वात आधी महिला दिवस साजरा करण्यात आला.

त्यानंतर ऑगस्ट 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आलं होत.

या परिषदेत जगभरात एक दिवस जागतिक महिला दिन साजरा केला जावा, असे ठरवण्यात आलं.

पण तेव्हा तो दिवस निश्चित केला गेला नव्हता. या घडामोडीनंतर 8 मार्च 1914 रोजी प्रथमच जगभरात महिला दिन साजरा करण्यात आला.

या दिवसापासून 8 मार्चला जगभरात महिला दिन साजरा केला जातो.

केव्हापासून महिलांना हक्कांची प्राप्ती

खरंतर महिला दिनाची सुरूवात महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी करण्यात आली.

कारण बहुतेक देशांमध्ये महिला मतदानाच्या अधिकारापासून वंचित होत्या.

भारतात महिलांना शिक्षण, मतदान यांसारखे अनेक मूलभूत अधिकार दिले गेले.

महिलांना आपल्या पतीच्या संपत्तीमध्ये ही समान हक्क आहे.

दरम्यान, जगभरात निरनिराळ्या पद्धतीनं महिला दिन साजरा केला जातो.

या महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुट्टीही देण्यात येते.

पालघर जिल्ह्यातील नांदगाव येथे राहणाऱ्या सुशीला खुरकुटे यांचा आज महिला दिनी खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मान करणार आहेत.

गावाच्या स्वच्छतेविषयी विशेष योगदान दिल्याबद्धल या आदिवासी महिलेचा शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात येणार.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *