Fri. Aug 14th, 2020

12 जानेवारी : काय असतो राष्ट्रीय युवा दिवस ?

आज राष्ट्रीय युवा दिवस म्हणजेच. युवकांच्या भाषेत म्हणायचं तर नॅशनल युथ डे (National Youth Day) युथ म्हणजे आजचा तरूण वर्ग. नवे विचार,नव्या कल्पना, बदलत्या तंत्रज्ञानाला सोबत घेऊन जाणारा आजचा युथ. आजचा युवा उद्या देशाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा आहे. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्याच्या युवावर्गावर अवलंबून असतं.

इतर देशांच्या तुलनेत तरुणांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या भारत देशात 12 जानेवारी हा दिवस दर वर्षी राष्ट्रीय युवा दिवस म्हाणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी Youth Day का साजरा केला जातो हे माहिती आहे का?

12 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस. 1984 पासून भारत सरकारने 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला.

जाणून घेऊया स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल
स्वामी विवेकानंदाचे विचार आणि त्याचा आदर्श संपूर्ण देशात मानले जातात. तरुणांमध्ये जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचं जीवन, विचार आणि वचनं नेहमीच मार्गदर्शक ठरतील.

12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल कोर्टात वकील होते. विवेकानंद यांचे मुळ नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते.
त्यांनी BA पर्यंतचे शिक्षण झाले होते.
वडिलांच्या मृत्यू नंतर त्यांचे जीवन गरिबीत गेले. दोन वेळेच्या जेवणाचे हाल होत असत. घरातले लोकांना पोटभर जेवता यावं त्यासाठी ते उपाशी राहत.
मूलतः नास्तिक असणाऱ्या नरेंद्र यांना गुरू रामकृष्ण परमहंस यांचा सहवास लाभल्यावर मात्र त्यांचे विचार बदलले. तर्कशुद्धरीत्या त्यांनी देवधर्माकडे पाहायला सुरुवात केली.
हिंदू धर्म आणि तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता.

इतर साधू संन्याशांप्रमाणे मुक्तीचा मार्ग शोधण्यात एकांतवासी जीन जगणं त्यांनी नाकारलं.

या उलट, ते लोकांमध्ये अधिकाधिक मिसळले. लोकांपासून दूर राहून विश्वाच्या उत्थानाचं स्वप्न पाहणं चुकीचं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

अनेरिकेसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्म या विषयावर अत्यंत ओजस्वी भाषण केलं.

‘Ladies and Gentlemen’ अशी सुरुवात करून भाषण करणाऱ्या इतर वक्त्यांमध्ये स्वामी विवेकानंद यांनी मात्र ‘माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो’ असं संबोधत आपल्या विशाल हृदयाचा अवचित दाखलाही दिला.

धर्म, भारतीय समा,ज शिक्षण, भारतीय स्रिया , सर्वधर्मसमभाव अशा विषयांवर त्यांनी समाजाला नवी दृष्टी दिली..
विश्व संस्कृतीमध्ये भारताचे खुप मोठे योगदान आहे.
विवेकानंदांनी तरूणांची कुवत आणि शक्ती केंद्रस्थानी ठेवली. त्यांनी तरूणांच्या शारिरीक नाही तर मानसिक शक्तीचा विचार आणि अभ्यास केला.
स्वामीविवेकानंद यांनी आधुनिक जगाच्या संदर्भात अनेक प्राचीन हिंदू शास्रांची व्याख्या लिहीली.
देशातील आजचा युवा हा उद्या देशाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा आहे. असे त्यांचे मत होते. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्याच्या युवांवर अवलंबून असते.
हिंदू धर्माच्या एकिकरणामध्ये स्वामी विवेकानंद यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आपण कोण आहोत आणि आपला जगाशी , भारताशी काय संबंध आहे याविषयी स्वामी विवेकानंदानी सांगितले आहे.

युवांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी मांडल्या. युवांना स्व:तचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रेरित केले. ते म्हणतात मानवाला महान बनण्यासाठी त्याने संशय,इर्षा,द्वेष सोडावा लागेल.
त्यांचे असेही मत होते की मानवाच्या आत्म्याचे कोणतेही लिंग नाही. त्यामुळे समाजात वावरताना महिलांना ही तेवढाच मानसन्मान दिला पाहिजे जेवढा पुरूषांना दिला जातो.
तरूणांना त्यांची ओळख बनवण्यासाठी स्वामी विवेकानंदानी त्यांची पाच सूत्रे सांगितली आहेत. ती कोणती ते जाणून घेऊयात
1- आत्मविश्वास
2-आत्मत्याग
3- आत्मसंयम
4- आत्मनिरभ्रर्ता
5- आत्मज्ञान

भारतीय संस्कृतीला स्वामी विवेकानंद यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर एका वेगळी आणि नवीन ओळख दिली.
स्वामी विवेकानंद यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हटले जाते. उठा, जागे व्हा आणि तो पर्यत थांबू नका जो पर्यत तुमचे ध्येय साध्य होत नाही. असा महत्त्वाचा संदेस स्वामी विवेकानंद यांनी जगाला दिला.

स्वामी विवेकानंद यांचा विदेशातला किस्सा
स्वामी विवेकानंद हे एकदा विदेशात गेले होते.तिथल्या लोकांनी त्यांना हॅलो म्हणण्यासाठी हात पुढे केला असता विवेकानंदांनी त्याना हात जोडून नमस्कार केला. विवेकानंदाना इंग्रजी येत नाही असे त्यांना वाटले. म्हणून पुढे त्यांनी तुम्ही कसे आहात असा मराठीतून प्रश्न विचारला त्यावर विवेकानंदांनी I am Fine असे उत्तर दिले.
आम्ही इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नाचे तुम्ही मराठीत उत्तर दिले आणि मराठी प्रश्नाचे इंग्रजीत उत्तर दिले असे का ? यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, तुम्ही जेव्हा तुमच्या आईचा सन्मान केलात तेव्ही मी माझ्या आईचा सन्मान केला. जेव्हा तुम्ही माझ्याआईचा सन्मान केलात तेव्ही मी तुमच्या आईचा

सन्मान केला.


देशात कसा साजरा केला जातो युवा दिवस?
राष्ट्रीय युवा भारतात उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी रॅली, योगा कार्यक्रम, शिबीरे, युवा मॅरेथॉन आयोजित केली जाते. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचे प्रकाशन भरवले जाते. अनेक शाळांत लहान मुलांच्या भाषणाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. याच निमित्ताने देशात National Youth Festival चे आयोजन केले जाते. 12 ते 16 जानेवारीला दरवर्षी Youth Festival चे आयोजन केले जाते. देशातील तरूण वर्गांना आपल्या कलागुणांना वाव देणारा हा रंगमंच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *