Fri. Feb 26th, 2021

नवी मुंबईत गणपती विसर्जनाला गालबोट; विजेच्या शॉकमुळे 7 कार्यकर्ते गंभीर जखमी

राज्यात दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडत असून नवी मुंबईतील सिवूड्स येथे प्रसिद्ध गणपतीच्या मिरवणुकीत विजेच्या शॉकमुळे 7 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. सिवूडचा प्रसिद्ध गणपती सिवूडचा महाराजाची मिरवणूक सुरू असताना नेरूळ येथील उड्डाणपुलावरुन खाली येत असताना विजेच्या वायरला धक्का लागल्याने शॉक लागून जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

दहा दिवसानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत 7 कार्यकर्त्यांना विजेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबईतील सिवूड्स येथे सिवूडचा महाराजा या गणपतीच्या विसर्जनावेळी विजेच्या वायरला धक्का लागून शॉक लागल्याची घटना घडली आहे.

विजेच्या वायरला धक्का लागल्यामुळे 7 कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

गणपतीच्या मुर्तीची उंची 22 फुट असून मुर्तीच्या मागेच्या बाजूला प्रभावळ होते.

त्यावेळी हे प्रभावळ विजेच्या वायरला स्पर्श झाला असल्यामुळे ही घटना घडली आहे.

या प्रभावळमध्ये लोखंडाचे रॉड असल्यामुळे विजेचा शॉक मुर्तीच्या शेजारी असलेल्या 7 कार्यकर्त्यांना विजेचा झटका बसला.

शॉक लागल्यामुळे जखमींवर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *