Sun. Oct 24th, 2021

सुख, समाधानच नाही तर तुमचा आत्मविश्वासही वाढवतात नवरात्रीतील नऊ रंग

Navratri 2018 Jai Maharashtra news

Navratri 2018 Jai Maharashtra news

नवरात्र खास मानली जाते ते नऊ दिवसात बदलणाऱ्या देवीच्या अवतारांसाठी आणि त्याहूनही अधिक नऊ दिवस बदलणाऱ्या रंगांसाठी. देवीच्या  नऊ अवतारांप्रमाणेच या रंगांनादेखील तितकंच महत्त्व आहे. कारण नवरात्रीच्या या रंगांचं स्वत:चं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. नवरात्रीतले हे  नऊ रंग सुख, समाधानच नाही तर तुमचा आत्मविश्वासही वाढवतात.

 

गडद निळा

नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या कालरात्री या अवताराला पुजण्यात येते. या दिवशी निळा रंग परिधान केला जातो. निळा रंग शांती आणि सौम्यतेचे प्रतिक मानला जातो. साधा आणि शांत स्वभावाच्या लोकांना निळा रंग जास्त भावतो. गडद निळ्या रंगात तणाव दूर करण्याची शक्ती असते. 

 

पिवळा  

पहिल्या दिवशी शैलपुत्री या अवताराला पुजले जाते. या अवतारातील देवी सर्व जीवांची रक्षणकर्ती मानली जाते. या दिवशी पिवळा रंग परिधान करण्यामागचं रहस्य असं की, पिवळ्या रंगातून उष्णतेची जाणीव होते. तसेच हा रंग उष्णतेचा वाहक मानला जातो. ज्या लोकांना पिवळा रंग जास्त भावतो,त्यांचा स्वभाव या रंगासारखाच समजुतदार मानला जातो.

 

हिरवा

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रम्हचारिणी अवतारात असते. या अवतारातची पुजा केली असता,  कुंडलिनी शक्ती जागृत होते. या दिवशी हिरवा रंग परिधान करण्यामागची संकल्पना अशी की, हा रंग मन: शांतीचं प्रतिक मानला जातो. शिवाय या रंगामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो.

 

राखडी 

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघटा या अवताराची आराधना केली जाते. या अवताराची पुजा-अर्चाना केल्यास भौतिक, आत्मिक, आध्यात्मिक सुख आणि शांती प्राप्त होते. तसेच कुंटुंबातील नकारात्मक ऊर्जा अशांती दुर होते. या दिवशी राखडी रंग परिधान केला जातो. कारण या रंगामुळेच आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

 

नारंगी

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीच्या कुष्मांठा या अवताराला पुजले जाते. या अवताराची उपासना केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात, अशी समजुत आहे. या दिवशी तेजाचे प्रतिक मानला जाणारा नारंगी रंग परिधान केला असता आपली  कल्पनाशक्ति तल्लख होते.

 

सफेद

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता या अवताराची पूजा केली जाते. या देवीची आराधना करणाऱ्या व्यक्तिला अलौकिक तेज आणि कांती प्राप्त होते. या दिवशी सफेद रंग परिधान केल्यास सुख समृद्धि लाभते. शिवाय हा रंग मानसिक शक्तिदेखील प्रदान करतो.

 

लाल

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी या देवीच्या अवताराला पुजण्यात येते. कात्यायनी या देवीच्या अवताराने आसुरांच्या शक्तिचा नाश  करुन सृष्टी सुरक्षित केली होती. तसंच लाल रंग उत्साहाचं प्रतिक मानला जातो. उगवत्या सुर्याचा रंगही लाल असल्यामुळे अशी समजुत आहे की, लाल वस्त्र परिधान करुन या अवताराची उपासना केल्यास आपल्यात उत्साह निर्माण होतो व स्वभावात दृढताही येते.

आकाशी

नव दुर्गाची पूजा नवव्या दिवशी सिद्धिद्री म्हणून केली जाते. असे सिद्ध केले जाते की देवीच्या या स्वरूपात प्रचुर प्रमाणात अलौकिक शक्ती आहेत कारण सिद्धिदत्री सर्व सिद्धिंचे प्रतीक आहे. दिवसाचा रंग निळा आहे. हे शांतता आणि शांतता प्रतिनिधित्व करते.

गुलाबी

नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीच्या महागौरी या अवताराची आराधना केली जाते. देवीच्या या अवताराला  धन-वैभव आणि सुख-शांतिचे प्रतिक मानले जाते. गुलाबी रंग भावनात्मक प्रेमाचा सुचक मानला जात असल्यामुळे या दिवशी गुलाबी रंग परिधान केला जातो.

 

 

      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *