Fri. Apr 16th, 2021

गडचिरोलीतील भामरागड मध्ये नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या

गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील वाहने जाळपोळ आणि भुसुरूंग स्फोट झाला. यामध्ये 15 जवान शहीद झाले. यानंतरही या भागात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी 40 जणांना ताब्यात घेण्यात आल आहे.  ही घटना ताजी असतानाचं नक्षल्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावाजवळ एका इसमाची हत्या केल्याची घटना रविवारी  रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे या परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान अजूनही या भागात नक्षली कारवाया सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.

गडचिरोलीतील नक्षली कारवाया सुरू

नक्षल्यांनी मध्यरात्री  भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावाजवळ एका इसमाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

डुंगा कोमटी वेळदा वय ३५  असे मृत इसमाचे नाव असून तो नैनवाडी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

तो लग्नसमारंभासाठी मर्दहूर येथे आला होता. तर या ठिकाणी रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी येवून त्याला सोबत नेवून त्याची हत्या केली आहे.

घटनेचा अधिक तपास सुरू असून नक्षली निवडणूकीच्या काळापासून हिंसक कारवाया करीत आहेत.

पोलिस विभाग नक्षलविरोधी अभियान राबवित असातानाच अशा घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनांमुळे जिल्ह्यात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *