Fri. Apr 23rd, 2021

‘Sorry, तुमच्या पतीची नक्षलींनी चुकून हत्या केली’, कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्याचं पत्र!

दहा दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षल्यांनी योगेंद्र मेश्राम या शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. आता मात्र ती हत्या चुकून झाली, असं म्हणत मेश्राम यांच्या कुटुंबाची नक्षलवाद्यांनी माफी मागितली आहे.

काय घडलं नेमकं?

बोटेझरी येथील कंत्राटी आरोग्य सेविका कस्तुरबा देवगडे यांचे पती योगेंद्र मेश्राम शिक्षक होते.

ते गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरू विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते.

दर शनिवारी ते पत्नीला भेटायला यायचे.

10 मार्चला ते ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात गेले होते.

ही संधी साधून नक्षलवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

मात्र या क्रूर घटनेनंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या(माओवादी) उत्तर गडचिरोली डिव्हिजनल कमिटीचा सचिव पवन याने एक पत्र जारी केलंय.

‘योगेंद्र मेश्राम हे दोषी नव्हते. मेश्राम परिवार आमचं टार्गेट नव्हतं. आमच्या गुप्तचर यंत्रणेच्या चुकीमुळे पोलीस समजून दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. मेश्राम कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असून आम्ही या घटनेबाबत आपली माफी मागतो. ही घटना आमची चूक आणि मोठी कमजोरी आहे.’ असं पवनने या पत्रकातून म्हटलं आहे. ‘समस्त जनता, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, व्यापारी आणि पत्रकारांचीही आम्ही माफी मागत आहे.’ पत्रात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *