नक्षल्यांचा धुमाकूळ, भूसुरुंगस्फोटात 15 जवान शहीद!

महाराष्ट्र दिन हा गडचिरोली परिसरात रक्तपाताचा ठरला आहे. कुरखेडा मध्यरात्री दादापूर येथे तब्बल 36 वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडवलाय. या स्फोटात 15 जवान शहीद झाल्याची शक्यता असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना आज 15 जवानांना शहीद व्हावे लागल्याने पोलीस विभागावर शोककळा पसरली आहे.
संबंधित बातमी- नक्षल्यांनी जाळली रस्त्याच्या कामावरील ३६ वाहनं!
आजच मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली.
त्यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान टाटाएस या खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाच्या अलिकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला.
त्यात १५ जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.
वाहनाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. घटनास्थळावर अजूनही पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक सुरु आहे