Sun. Oct 17th, 2021

नयना पुजारी बलात्कार प्रकरण; तीनही आरोपींना फाशीची शिक्षा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

राज्याला हादरवुन सोडणाऱ्या नयना पुजारी प्रकरणात न्यायालयानं तीनही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

 

विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली. योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तीनही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

 

हे तीनही आरोपी 6 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरले आहेत. अपहरण, जबरी चोरी, सामूहिक बलात्कार, हत्या, मृताच्या शरिरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा गुन्ह्यांखाली या नराधमांना

दोषी ठरवण्यात आले.

 

तर, माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. संगणक अभियंता असणाऱ्या नयना पुजारीवर सामुहिक बलात्कार करुन तीची निर्घुण हत्या करण्यात आली

होती. 2009 मध्ये घडलेल्या या घटनेचा निकाला 2017 मध्ये लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *