Tue. Sep 28th, 2021

घड्याळ्याचे बारा वाजले आहेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुका तोंडावर ठेपल्या असून राजकीय पक्ष निवडणुकांसाठी सज्ज झाली आहेत. प्रचारसभेत राजकीय पक्ष एकामेकांवर टीकांचा वर्षाव करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर त्यात फक्त ताजमहाल देऊ असे आश्वासन देण्याचे विसरले असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द केल्यामुळे त्यांच्यावरही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?

अजित पवारांच्या घड्याळ या चिन्हाचे बारा वाजले आहेत.

पिंपरी  चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही त्यांना दोन उमेदवार देतात येत नाही आहे.

घड्याळ्याचे बारा वाजल्यामुळे कोणताही नेता घड्याळ हातात घेत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात फक्त ताजमहाल देऊ असे आश्वासन देण्याचे विसरले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाशी लढायचं समजत नसून पुढे पैलवानच नाही अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

ही परिस्थिती फक्त पिंपरी-चिंचवडमध्ये नसून संपूर्ण राज्यात झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर ठेपली असताना दुसरीकडे राहुल गांधी बॅंकॉकला गेले आहेत.

तसेच शरद पवारांची सध्या अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ अशी झाली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *