Fri. Mar 5th, 2021

#Corona | शरद पवार ११ वाजता जनतेशी साधणार संवाद

राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. जनतेला वारंवार आवाहन करुन देखील जनता घरात बसायला तयार नाही. त्यामुळे कोरोनाचा पादुर्भाव वाढण्याची चिन्ह आहेत. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे सध्या अनेक बडे नेते जनतेसोबत सोशल मीडियाद्वारे संवाद साधत आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज जनतेला ११ वाजता फेसबुकद्वारे संवाद साधणार आहेत. याबाबतची माहिती शरद पवारांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

काय म्हटलंय ट्विटमध्ये ?

कोविड-१९ विषाणू महामारीशी सामना करताना आपल्याला एकत्रितपणे काही निर्बंध स्वीकारावे लागतील. यासंदर्भात तुमच्याशी गुरुवार दि. २ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता माझ्या फेसबुक पेजवरून संवाद साधणार आहे.

याआधी शरद पवारांनी २७ आणि २९ मार्चला जनतेशी संवाद साधला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राज्यातील जनतेसोबत सातत्याने फेसबुकद्वारे संवाद साधत आहेत. या संवादात शरद पवारांना जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतात. तसंच जनतेला कोरोनासंदर्भात मार्गदर्शन करतात.

दरम्यान राज्यातील कोरोना ग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढतोय. ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ३३५ इतका झाला आहे. कोरोनाग्रस्तांची माहिती आरोग्यमंत्र्यांनी ट्विटरवर दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *