‘आओ मिलके देश बनाये’, NCP चा जाहीरनामा प्रसिद्ध

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्ष यासाठी सज्ज आहेत.राष्ट्रवादी पक्षाने या निवडणुकीतील पक्षाचा जाहीरनामा नुकताचं प्रसिद्ध केला आहे. ‘आओ मिलके देश बनाये’ ही नवीन टॅग लाईन या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी घोषीत केली आहे. तसेच नोटाबंदीची श्वेतपत्रिका काढू,शेतीच्या शाश्वत विकासाला प्राधान्य देऊ,सरकार आल्यानंतर तिहेरी तलाकचा नवा मसुदा बनवू अशा मुद्यांसह हा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेत हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई कमी करणे हा या जाहीरनाम्याचा उद्देश आहे. असं जाहीरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. ‘हमारा, आपका, हम सबका भारत’ही जाहीरनाम्याची संकल्पना आहे. असंही ते म्हणाले आहेत.
जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे
शेतकऱ्यांची परिस्थीती हालाकीची असून शेती आणि शेतकऱ्यांवर लक्ष दिलं जाईलं.
शेतीच्या शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यात येईल.
युवा आणि महिला या वर्गाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देवू.
स्वायत्त संस्थाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
नोटाबंदीमुळे देशाच्या आर्थिक विकासाची गती मंदावली लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
या मुद्दयांना लक्षात घेवून नोटाबंदीची श्वेतपत्रिका काढू
वित्तीय तूट जीडीपीच्या ३ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.
तिहेरी तलाकचा नवीन मसुदा करणार
भाजपच्या काळातील तिहेरी तलाकाच्या अध्यादेशाचे राज्यसभेत कायद्याचे रुपांतर झाले नाही.
सत्तेत आल्यानंतर मुस्लिम समाजाला एकत्र घेवून नवीन मसुदा तयार केला जाईल.
भाजपा सरकारवर टीका
शेती, वन्य उत्पादन आणि मत्स्योत्पादन क्षेत्रातील उत्पादनांच्या २०१८ – १९ मध्ये २.७ टक्क्यांनी घट झाली.
शेती आणि शेतकर्यांची परिस्थिती हलाकीची आहे.
सुटाबुटाच्या या सरकारने भांडवलवाद्याचे कर्ज माफ केलं आहे.
भाजपने अल्पसंख्याकांशी चर्चा न करता तिहेरी तलाकचा अध्यादेश आणल्याने कायद्यात रूपांतर झाले नाही.
नोटाबंदीमुळे देशाच्या आर्थिक विकासाची गती मंदावली असून लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागली.
आरबीआयच्या दोन गव्हर्नरांनी राजीनामा दयावा लागला.
सीबीआयच्या संचालकाला तडकाफडकी काढले गेले आहे.