अमोल कोल्हे यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीचे मंत्री आपापसात भिडले

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. मात्र, या चित्रपटावरून वाद होण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांच्या या चित्रपटावर काही नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. नथुराम गोडसेंची भूमिका साकारण्यासाठी राष्ट्रवादीकडून समर्थन करण्यात आले आहे. आणि त्याला काँग्रेसचे समर्थन लाभत आहे. तर शिवसेना मात्र या वादापासून स्वत:ला अलग ठेवू पाहतेय. मात्र, राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी अमोल कोल्हे यांना समर्थन दाखवले आहे तर जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हे यांच्याविरोधात भाष्य केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले की, ‘डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही.’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे लवकरच नथुराम गोडसेट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, त्यांच्या या चित्रपटावरून अमोल कोल्हे यांच्या भूमिकेमुळे वाद होण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांचा व्हाय आय किल्ड गांधी चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदर्शित होणार आहे.