Tue. Feb 25th, 2020

NCP ला नवी मुंबईत धक्का, गणेश नाईक भाजपमध्ये!

भाजपच्या मेगाभरतीमध्ये आणखी एक मोठं नाव आलं आहे, ते म्हणजे गणेश नाईक आणि संजीव नाईक यांचं. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून गणेश नाईक आता भाजपवासी झाले आहेत. त्यांच्यासोबत 48 नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील मोठे नेते आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश नाईक यांच्यासारखा मोठा नेता भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद चांगलीच वाढली आहे.

काय म्हणाले गणेश नाईक?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा लौकीक वाढलाय.

नरेंद्र मोदींनी देशाबाहेर भारताचं नाव मोठं केलंय.

कलम 370 रद्द करण्यासारखे अनेक धाडसी आणि चांगले निर्णय या सरकारने घेतले.

नवी मुंबईतील गावठाण विस्तार योजना खूप आधी व्हायला हवी होती.

15 वर्षं मी मंत्री राहिलो तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना न्याय नाही देऊ शकलो, याची मला खंत आहे.

मागच्या मुख्यमंत्र्यांना मी कमी लेखत नाही, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे काम केलंय, ते पुढेही असंच करतील असा विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *