लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

नवी दिल्ली : मध्य रेल्वेवरील प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रवाशांना रेल्वेच्या दारात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानक हे सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक स्थानक आहे.
डोंबिवलीकर रेल्वे प्रवाशांच्या समस्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडल्या.
डोंबिवलीवरुन छशिमटसाठी सुटणारी गाडी कल्याण वरुन सुटते. त्यामुळे कल्याण वरुन येणाऱ्या गाडीत प्रचंड गर्दी असते. त्यामुळे डोंबिवली स्थानकात गाडी आल्यावर डोंबिवलीकरांना गर्दीमुळे चढायला मिळत नाही.
याबद्दल मी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पण अद्याप यावर कारवाई झाली नाही, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले. तसेच रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात यासंदर्भात ही सुप्रिया सुळेंनी मागणी केली.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करण्याबाबतचे लेखी निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते.